मुख्यपृष्ठ › सामाजिक · आळेफाटा
चिमुकल्या वारकऱ्यांची भव्य दिंडी! विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमला आळेफाटा
आषाढी एकादशी विशेष
आळेफाटा परिसरात ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट, रेडा समाधी यांच्या पुढाकाराने आणि परिसरातील विविध शाळांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बाल वारकरी दिंडी उत्साहात पार पडली.
वारकरी वेशभूषेतील चिमुकले, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ-चिपळ्या, मुखी विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण आळेफाटा दुमदुमून गेला.




