मुख्यपृष्ठ › व्यवसाय · वडगाव आनंद
वडगाव आनंद सोसायटीचा सभासदांना दिवाळीचा गोडवा! ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते भेटवस्तू वाटप
दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वडगाव आनंद विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वतीने सभासदांसाठी दिवाळी भेटवस्तू वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ सभासदांच्या शुभहस्ते भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सभासदांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभासदांशी आपुलकीचे नाते जपत दिवाळीचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा सोसायटीचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
पाहा दिवाळी भेटवस्तू वाटप समारंभाची खास झलक!
