मुख्यपृष्ठ › सामाजिक · आळेफाटा परिसर

वाढदिवसाचा खर्च टाळत डॉ. संजय गाडेकरांचा सेवाभावी उपक्रम; रस्त्यावरील खड्डे बुजवले!

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत डॉ. संजय गाडेकर यांनी सेवाभावी उपक्रम राबवला. वाढदिवसानिमित्त रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून ते बुजवण्यात आले.

“आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” या भावनेतून हा उपक्रम केल्याचे डॉ. गाडेकर यांनी सांगितले. वाढदिवसाचा खर्च समाजोपयोगी कामासाठी वापरत त्यांनी नागरिकांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला.