मुख्यपृष्ठ › गुन्हे / अपघात · आळेफाटा
राजुरी अपघातानंतर देवराम लांडे आक्रमक! थेट आळेफाटा पोलीस ठाण्यावर मोर्चा ! नक्की काय झाले?
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील राजुरी येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार राजू साहेबराव मुठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी जाईबाई मुठे गंभीर जखमी झाल्या आहेत.
या अपघातातील पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी देवराम लांडे आक्रमक झाले. त्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी चर्चा केली. यावेळी अपघातप्रकरणी योग्य कारवाईची मागणी करण्यात आली.
दरम्यान, जखमी जाईबाई मुठे यांच्या उपचारासाठी एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने आर्थिक मदत देत माणुसकीचे दर्शन घडवले.
महामार्गावरील वाढते अपघात, अवजड वाहनांची वर्दळ आणि ओव्हरटेकची घाई यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




