मुख्यपृष्ठ › सामाजिक · आळे

श्री रेडा समाधी मंदिर परिसर भक्तिमय दर्शनासाठी भाविकांची रीघ आषाढी एकादशी निमित्त भक्तांचा महासागर

आषाढी एकादशी विशेष | रेडा समाधी मंदिर, आळे

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरला जाता न आल्याने हजारो विठ्ठलभक्तांनी आळे (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील श्री रेडा समाधी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली. मंदिर परिसरात "ज्ञानोबा-तुकाराम", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "विठ्ठल विठ्ठल" या नामघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.

फुलांनी सजलेले मंदिर, हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तांच्या अखंड दर्शनरांगा यामुळे रेडा समाधी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला.

या व्हिडिओमध्ये पाहा— रेडा समाधी मंदिरातील आकर्षक सजावट

  • आषाढी एकादशीची भक्तिमय वातावरणनिर्मिती
  • दर्शनासाठी आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी
  • विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमलेला मंदिर परिसर