मुख्यपृष्ठ › सामाजिक · आळेफाटा
आळेफाट्यात संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त भक्तीचा महोत्सव; ५ ते १२ ऑगस्ट २०२६ अखंड हरिनाम सप्ताह
श्री संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळा व पुण्यतिथीनिमित्त दि. ५ ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व श्री दासबोध पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात दररोज: काकडा आरती
- श्रींचा अभिषेक
- श्री दासबोध पारायण
- गाथा भजन व नेमाचे भजन
- हरिपाठ व महाआरती
- सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नामवंत कीर्तनकारांची हरीकीर्तने
ह.भ.प. समाधान महाराज शर्मा, पोपट महाराज कासारखेडकर, अक्रूर महाराज साखरे, शंकर महाराज शेवाळे, महेंद्र महाराज नलावडे, वैष्णवी सरस्वती दीदी, ज्ञानेश्वर माऊली वाबळे यांचे कीर्तन व प्रवचन होणार आहे.
- ११ ऑगस्ट: दुपारी ३ ते ६ भव्य पालखी सोहळा व रात्री महाप्रसाद.
- १२ ऑगस्ट: ह.भ.प. बजरंग महाराज कर्जुलेकर यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता.
हरिनामाचा गजर, संतविचारांचा अमृतवर्षाव आणि भक्तीमय वातावरणाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




