मुख्यपृष्ठ › राजकारण · आळेफाटा

९ ऑगस्टला आळेफाट्यात महामार्गावर चक्काजाम! पुणे-नाशिक सरळ रेल्वेमार्गासाठी जनआंदोलन,मोठी बातमी

९ ऑगस्टला आळेफाट्यात महामार्गावर चक्काजाम! | पुणे-नाशिक सरळ रेल्वेमार्गासाठी जनआंदोलन

पुणे-नाशिक सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी आता निर्णायक लढ्याची घोषणा करण्यात आली आहे. क्रांतीदिनाचे औचित्य साधत ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आळेफाटा येथे पुणे-नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वेमार्ग अहिल्यानगरमार्गे वळविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि मूळ सरळ रेल्वेमार्गालाच मंजुरी मिळावी या मागणीसाठी हे जनआंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या बैठकीत पंचायत समिती सदस्य जयसिंग पोटे, माजी सदस्य जीवन शिंदे, सचिन वाळुंज, प्रदीप देवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विशाल कुऱ्हाडे, वडगाव आनंदचे उपसरपंच संतोष पाटील आणि परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

या व्हिडिओमध्ये पाहा:

९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाची संपूर्ण माहिती

पुणे-नाशिक सरळ रेल्वेमार्गाची नेमकी मागणी

आंदोलनामागील कारणे

नागरिक आणि मान्यवरांची भूमिका

पुढील आंदोलनाची दिशा