मुख्यपृष्ठ › राजकारण · आळेफाटा
पुणे–नाशिक सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी आळेफाटा येथे रास्ता रोको आंदोलन; पावसातही उत्स्फूर्त सहभाग
रेल्वे सरळ मार्गे जावी यासाठी आळेफाटा येथे रास्ता रोको! पुणे–नाशिक सरळ रेल्वेमार्ग आळेफाटामार्गे व्हावा, या प्रमुख मागणीसाठी क्रांती दिनानिमित्त आळेफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पावसाची पर्वा न करता नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रेल्वे मार्गासाठी लढणारे आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पुणे–नाशिक रेल्वेचा सरळ मार्ग आळेफाटा, नारायणगाव, मंचर, खेड, चाकणमार्गे व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधून घेत पुणे–नाशिक सरळ रेल्वेमार्गाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. क्रांती दिन – ९ ऑगस्ट




