मुख्यपृष्ठ › सामाजिक · आळेफाटा

राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाले पोलीस पदक! श्वान प्रशिक्षक गेनभाऊ भुजबळांचा थक्क करणारा प्रवास

१५ ऑगस्ट विशेष | राष्ट्रपती पोलीस पदक विजेते गेनभाऊ कृष्णाजी भुजबळ यांची प्रेरणादायी कहाणी

पोलीस दलातील श्वान पथकात तब्बल ३० ते ४० वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणारे गेनभाऊ कृष्णाजी भुजबळ यांना सन १९९५ मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते रेल्वे पोलीस दलातील (GRP) श्वान पथकातील उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

श्वानांना गुन्हेगारांचा माग काढणे, बॉम्ब व स्फोटके शोधणे, घटनास्थळावरील वासाच्या आधारे तपासात मदत करणे अशा अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी प्रशिक्षण देण्याचे काम भुजबळ यांनी केले.

त्यांनी ‘मेजर’, ‘सनी’, ‘जॅकी’ यांसारख्या पोलीस श्वानांसोबत काम केले. विशेष म्हणजे ‘मेजर’ या श्वानाला अवघ्या दोन महिन्यांचा असल्यापासून प्रशिक्षण देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनेक श्वानांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.

या विशेष मुलाखतीत जाणून घ्या—

  • श्वान प्रशिक्षणाचा थरारक प्रवास
  • राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याचा अनुभव
  • गुन्हे शोध आणि बॉम्बशोध मोहिमेतील अनुभव
  • पोलीस दलातील ४० वर्षांची देशसेवा
  • श्वान आणि प्रशिक्षक यांच्यातील अनोखे नाते
  • सेवानिवृत्तीनंतरचा आळेफाटा येथील प्रवास

कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि देशसेवेची प्रेरणादायी कहाणी!