मुख्यपृष्ठ › सामाजिक · जुन्नर

नागपंचमीला सापांना दूध पाजावे का? सर्पमित्र आकाश माळी यांनी सांगितले सत्य

श्रावण, नागपंचमी आणि साप — सर्पमित्र आकाश माळी यांची विशेष मुलाखत

श्रावण महिना आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सापांबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आणि गैरसमज असतात. साप घरात का येतात? कोणते साप विषारी असतात? साप चावल्यास तातडीने काय करावे? नागपंचमीला सापांना दूध पाजणे योग्य आहे का? सापांचे पर्यावरणातील महत्त्व काय आहे? अशा अनेक प्रश्नांची माहिती या विशेष मुलाखतीतून जाणून घेणार आहोत.

या मुलाखतीत वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम, जुन्नरचे संस्थापक सर्पमित्र आकाश माळी यांनी सापांविषयी महत्त्वाची आणि जनजागृती करणारी माहिती दिली आहे.

या व्हिडिओमध्ये जाणून घ्या :

  • श्रावणात साप जास्त का दिसतात?
  • घरात साप आल्यास काय करावे?
  • कोणते साप विषारी असतात?
  • सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये?
  • नागपंचमीला सापांना दूध पाजणे योग्य आहे का?
  • सापांबाबतचे गैरसमज आणि वैज्ञानिक सत्य
  • सापांचे पर्यावरणातील महत्त्व
  • सर्पसंवर्धन आणि नागरिकांची भूमिका

निसर्गाचे रक्षण करूया, भीती नाही – संवर्धन करूया!