मुख्यपृष्ठ › शेती · माळवाडी

शेतजमिनी वाचवा! कल्याण–लातूर महामार्गाविरोधात माळवाडीचे शेतकरी आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

“शेतजमिनी वाचवा!” या मागणीसाठी कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाविरोधात माळवाडीतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. प्रस्तावित महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी बाधित होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी महामार्गाचा मार्ग बदलण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी पुणे–नाशिक महामार्गासाठी जमिनी गेल्यानंतर पुन्हा जमीन संपादन झाल्यास उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या हरकती व सूचना विचारात घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको आणि त्यानंतर आमरण उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.