मुख्यपृष्ठ › सामाजिक · वडगाव आनंद
वडगाव आनंदमध्ये अंड्यांच्या दुर्गंधीने नागरिक हैराण! आरोग्य धोक्यात
वडगाव आनंद येथील चासकर मळा परिसरात अंडी व्यवसायाशी संबंधित ठिकाणी अंडी अस्ताव्यस्त पद्धतीने ठेवण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. खराब अंड्यांमुळे परिसरात उग्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.
या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित व्यवसायिकांनी स्वच्छता व अंड्यांची योग्य विल्हेवाट याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणी संबंधित प्रशासनाने पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.




