मुख्यपृष्ठ › गुन्हे / अपघात · आळेफाटा

ऊसतोड मजुरांच्या नावाखाली १ कोटी २२ लाखांचा गंडा! ५ मुकादमांपैकी २ जणांना आळेफाटा पोलिसांनी केली अटक

जुन्नर तालुक्यातील शेतकरी आणि कंत्राटदारांना ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ₹1,22,45,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच आरोपींपैकी दोन जणांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

  • पैसे घेतले, पण मजूर पाठवले नाहीत!
  • आळेफाटा पोलिसांची धडक कारवाई
  • शेतकरी व कंत्राटदारांसाठी मोठा इशारा