मुख्यपृष्ठ › सामाजिक · आळेफाटा
आळेफाटा पोलिसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक उत्साहात; धरला पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर ठेका
आळेफाटा पोलिसांनी बसवलेल्या श्री गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक उत्साहात पार पडली.
यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांनी पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर उत्स्फूर्तपणे ठेका धरत गणरायाला निरोप दिला. ढोल-ताशांचा गजर, भक्तिमय वातावरण आणि उत्साहामुळे विसर्जन मिरवणुकीला विशेष रंगत आली.




